नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) उपद्रव शोध पथकाने सोमवारी 18 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 1 लक्ष 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 15 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 80,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 90 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.


उपद्रव शोध पथकाने (NDS) प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत श्रध्दानंदपेठ येथील फुड पोर्ट आणि आयटी पार्क, गायत्रीनगर येथील Cuckrafiz Foods यांच्याविरूध्द कारवाई करून 10 हजार रुपये दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत मुंजे मार्ग, सीताबर्डी येथील हॉटेल हरदेव यांच्याविरूध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन अंतर्गत हुडकेश्वर रोड येथील माँ शारदा मिष्ठाण भंडार यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील राम भंडार यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत खरबी रोड येथील A-1 फॅमेली फॅशन यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक महाल येथील बॉम्बेवाला (Bombaywala) , सुत मार्केट, गांधीबाग येथील अमरिता कलेक्शन या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत जामदारवाडी, बिनाकी येथील देवकी स्विट यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आणि अल्ताफ कपडा कारखाना यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत एच.बी.टाऊन (HB Town) येथील Sarvadnya Offset यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशीनगर झोन अंतर्गत वैशाली नगर येथील पॅरेलाल सोनपापडी आणि टेका नाका, कामठी रोड येथील राजश्री बेकरी यांच्याविरूध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत पुनम चेंबर, छावनी, सदर येथील झारा किडस टॉइस आणि राज भंडार स्विट या दुकानांविरूध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत शंकरनगर येथील विठठल रुक्मीणी निवास यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच राजकमल कॉम्प्लेक्स, पंचशिल चौक येथील AEON IAS Academy यांच्याविरुध्द विद्युत खांबावर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर येथील सुदाम भिमटे यांच्याविरुध्द रस्त्यालगत वॉशिंग रॅम्पचे अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.  


खालील प्लास्टिक वस्तुंवर बंदी


केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि 100 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.