Abhishek-Aishwarya Bachchan : निम्रत कौर सध्या अभिषेक बच्चनसोबतच्या (Abhishek Bachchan) अफेअरच्या चर्चांमुळे समोर आली आहे. निम्रत कौरमुळे अभिषेक आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्याचा दावाही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. या सगळ्यामध्ये निम्रतचे लग्नाबाबतचे एक जुने वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल निम्रत कौर काय म्हणाली?
'दासवी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने सांगितले होते की, त्यांच्या लग्नाला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि हे सांगितल्यानंतर अभिषेकने 'टचवुड' म्हटले होते. हे ऐकून निम्रत अशी एक कमेंट केली ज्यामुळे अभिषेकही हैराण झाला होता. 'लग्न फार काळ टिकत नाहीत,' असं तिने मिश्किलपणे म्हटलं आण त्यावर ती हसते. तेव्हा अभिषेकही तिला थ्यँक्यू असं म्हणतो आणि त्यावर दोघेही हसायला लागतात.
अभिषेकने निम्रतसमोरच केलं होतं ऐश्वर्याचं कौतुक
त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चनने निम्रत कौरसमोर पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले होते. अभिषेक म्हणाला होता, 'माझी पत्नी या बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. ती मला नेहमीच आधार देत आली आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब आहे. ऐश्वर्याही याच क्षेत्रात काम करते त्याच्यामुळे तिच्यासारखा जोडीदार मिळणं माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे. ती माझ्यापेक्षा आधीपासून इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. त्यामुळे तिला जगाची माहिती आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय 2007 मध्ये अडकले लग्नबंधनात
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला आता जवळपास 18 वर्ष झाली आहेत. या जोडप्याने 2007 मध्ये लग्न केले आणि काही वर्षांनी त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केले. सध्या या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. अंबानी कुटुंबीयांच्या लग्नात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत एकटीच पोहोचली तेव्हापासून या चर्चा जास्त होऊ लागल्या. अभिषेक त्याचे आई-वडील आणि बहिणीसोबत पोहोचला होता. यानंतर अनेक वेळा ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत दिसली आणि त्यावेळी अभिषेक गायब होता. त्यातच आता अभिषेक आणि निम्रत कौरच्या अफेरच्या चर्चा सुरु आहेत.