Sanjay Dutt : संजय दत्तला (Sanjay Dutt) मुन्नाभाईच्या भूमिकेत पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. त्यामुळे मुन्नाभाई एम.बी.बी.एस आणि लगेरहो मुन्नाभाई या सिनेमानंतरही प्रेक्षक मुन्नाभाई 3ची (Munnabhai 3) आतुरतेने वाट पाहत आहेत. राजकुमारी हिरानी दिग्दर्शित हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. इतकच नव्हे मुन्नाभाई 3 वर काम सुरु असल्याचं राजकुमार हिरानी यांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. पण यावर आता स्वत:मुन्नाभाईचीच प्रतिक्रिया समोर आलेली आहे.
मुन्नाभाई सिनेमाविषयी संजय दत्तने ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्याने चाहत्यांनाही एक खास विनंती केलीये. म्हणून आता संजय दत्त मुन्नाभाईच्या भूमिकेत प्रेक्षकांना कधी दिसणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीये. संजय दत्तने काय म्हटलं सविस्तर जाणून घेऊयात.
संजय दत्तने काय म्हटलं?
मुन्नाभाई 3 कधी येणार यावर बोलताना संजय दत्तने म्हटलं की, मुन्नाभाई 3 कधी रिलीज होणार हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी राजकुमार हिरांनींनाच विचारा. कारण मी पण त्यांना हा प्रश्न विचारुन थकलोय.माझं आवडतं कॅरेक्टर मुन्नाभाई कधी परत कधी येणार हा प्रश्न मी पण त्यांना वारंवार वितारतोय.
'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. त्यामुळे आपल्या अभिनयाने त्याने सर्वांना थक्क केले. यानंतर 2008 मध्ये संजूने मान्यतासोबत लग्न केलं. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये आपली दुसरी इनिंग सुरू केली. संजयच्या आयु्ष्यावर आधारित असलेला 'संजू' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
संजय दत्तचे सर्वोत्कृष्ट सिनेमे कोणते? (Sanjay Dutt best Movies)
सुनील दत्त दिग्दर्शित 'रॉकी' या सिनेमाच्या माध्यमातून संजयने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. संजयची मुख्य भूमिका असलेला 'नाम' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. महेश भट्ट दिग्दर्शित सडक या सिनेमात संजय मुख्य भूमिकेत होता. त्याचे 'साजन', 'कुरुक्षेत्र' आणि 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
ही बातमी वाचा :