मुंबई : संपूर्ण भारताला वेड लावणाऱ्या नेटफ्लिक्सच्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. नेटफ्लीक्स इंडियाने त्यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. नेटफ्लीक्स इंडियाने आज (मंगळवारी) "कॅलेंडर निकाल, तारीख लिख ले, 14 दिन में कुछ बडा होनेवाला है" असे ट्वीट केले आहे. या ट्वीटवरुन लोकांनी अंदाज लावला आहे की, सेक्रेड गेम्सचा सीजन 2 येतोय

नेटफ्लीक्सने केलेल्या ट्वीटनुसार 14 दिवसांत काहीतरी होणार आहे. म्हणजेच 14 दिवसांनी सेक्रेड गेम्स या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाचा टिझर किंवा ट्रेलर प्रदर्शित केला जाऊ शकतो. कदाचित सीजन 2 प्रदर्शित केला जाऊ शकतो, असा अंदाज 'सेक्रेड गेम्स'प्रेमी व्यक्त करत आहेत.

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी सेक्रेड गेम्स ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी (गणेश गायतोंडे), सैफअली खान (सरताज सिंग) हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत. ऑगस्ट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या सेक्रेड गेम्स या बेवसिरीजने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.


पच्चीस दिन है तुम्हारे पास!
सेक्रेड गेम्समध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने साकरलेला गणेश गायतोंडे पुन्हा एकदा पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. पहिल्या सीजनमध्ये गणेश गायतोंडेने सरताजला सांगितले होते की, "पच्चीस दिन में सब मर जायेंगे, बस त्रिवेदी बचेगा." त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये त्रिवेदी हे पात्र आपल्याला प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. तसेच पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.