रत्नागिरी : कोकणातील हापूस (Kokan Alphanso) आंब्याची (Mango) जानेवारी महिन्यात विक्रमी आवक झाली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यांत हापूसच्या फक्त 25 ते 30 येत होत्या. मात्र यंदा 360 पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्यात.. तसंच प्रत्येक पेट्यांना 7 ते 12 हजारांचा दर या आंब्यांना मिळू लागलाय. आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याला एप्रिल महिना उजाडतो.
कोकणातील शेतकरी आता हापूस आंब्याचे पिक लवकर घेवू लागल्याने एपीएमसीत आंबा वेळेच्या आधी येत आहे. आता आलेला हापूस आंब्याचा मोहोर हा गेल्या वर्षीच्या ॲाक्टोबर महिन्यातील आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आलेला मोहोर हा आवकाळी पावूस , थ्रीप्स रोगामुळे गळाल्याने एप्रिल महिन्यात हापूस आंब्याचे उत्पन्न कमी होणार आहे. सध्या येत असलेल्या मोहोरवर कोणती बाधा न आल्यास मे महिन्यात चांगली आवक एपीएमसीत दाखल होवू शकते
कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी
फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते.लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. कोकणातील हापूसला पुणे, मुंबई प्रमाणे विदेशात चांगली मागणी आहे. कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूसची निर्यात होत असते. महिन्याभरापूर्वी पुण्यात देवगड आब्यांची पहिली पेटी विकली गेली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी हापूस विकला गेला. दापोली तालुक्यातील हर्णेमधील हापूस आंबा मुंबई मार्केट मध्ये विकला गेला. त्यामुळे आंबा पिकाला पुढे हंगामात चांगलं पीक येऊन सुगीचे दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु
यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरु झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून मार्च किंवा महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक सुरु होईल. आंबा पिकायला आणि बाजारपेठेत विक्रीसाठी येण्याला एप्रिल महिना उजाडतो. यंदा आंबा लवकर केल्याने आंबाप्रेमींना जानेवारीतच आंबा चाखायला मिळणार आहे. आंबा पिकाला पुढे हंगामात चांगलं पीक येऊन सुगीचे दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
रत्नागिरीचो हापूस मुंबईक इलो! यंदाच्या हंगामातली पहिली हापूस पेटी मुंबईला रवाना, एका पेटीला मिळाला एवढा भाव