Continues below advertisement

मुंबई : सिडकोने (CIDCO) प्रथमच नवी मुंबईत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve)’ तत्त्वावर 4,508 घरांची गृहनिर्माण योजना (Housing Scheme) जाहीर केली आहे. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाइन अर्ज (Online Application) नोंदणीला सुरुवात होणार असून अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका (Flat Selection) निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Continues below advertisement

पसंतीची सदनिका निवडीचे स्वातंत्र्य (Freedom of Flat Choice)

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, योजनेत लॉटरी नसून थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना स्वप्नातील घर निवडण्याची संधी मिळणार आहे.

कोणासाठी किती घरे? (CIDCO Scheme Distribution)

1,115 घरे - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS)

3,393 घरे - अल्प उत्पन्न गटासाठी (LIG)

EWS सदनिकांसाठी PMAY अंतर्गत 2.50 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध आहे.

तयार घरे, त्वरित ताबा (Ready-to-Move Homes)

सर्व सदनिका रेडी टू मूव्ह असून, संपूर्ण रक्कम भरल्यानंतर तात्काळ ताबा दिला जाणार आहे. कागदपत्र पडताळणीनंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुविधा मिळेल.

उत्तम कनेक्टिव्हिटी (Prime Location & Connectivity)

सर्व गृहसंकुले नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये असून मेट्रो, उपनगरीय रेल्वे, महामार्ग आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या जवळ असल्याने उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळते.

ऑनलाइन नोंदणीसाठी महत्त्वाच्या तारखा (Online Registration & Dates)

अर्जासाठी संकेतस्थळ: cidcofcfs.cidcoindia.com

नोंदणी सुरु: 22 नोव्हेंबर 2025, दुपारी 4 वाजता

नोंदणीची अंतिम तारीख: 21 डिसेंबर 2025

पसंतीची सदनिका निवड: 28 डिसेंबर 2025, सकाळी 11 वाजता

सिडकोने नागरिकांना लवकर अर्ज करून घराच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.