Navi Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरुन (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर (MNS) आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. अमित ठाकरे ( Amit Thackeray) यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परत बंद केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन सुरु आहे. 

Continues below advertisement

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी  मनपा आयुक्त आणि प्रशासनाचे निषेध करणारे  पत्रक उधळले 

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त आणि प्रशासनाचे निषेध करणारे  पत्रक उधळले आहे. यावेळी त्यांनी ठिय्या माडूंन जोरदार घोषणाबाजी देखील केली. दोन दिवसात परत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक खुले न केल्यास आम्ही घुसून खुले करु असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रशासनाला दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे नवी मुंबईच्या (Navi Mumbai) दौऱ्यावरआले होते तेव्हा त्यांनी नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) स्मारकाचे अनावरण केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण झालेलं नव्हतं.तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होती. हे बघताच अमित ठाकरेंनी स्व:त या पुतळ्याचे अनावरण केलं होतं. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलीस आणि मनसे सैनिकांमध्ये काही काळ झडप झाल्याचेही चित्र बघायला मिळेल. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होते असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस होणार आहे. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्र अमित ठाकरेंनी घेतला होता.

Continues below advertisement

शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी अमित ठाकरेवर गुन्हा दाखल

नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी अमित ठाकरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी पोलिसांकडून दीड तास प्रतीक्षा करण्यात आली. दीड तासानंतर सुद्धा अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही. दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा प्रशासनाने झाकला आहे. याच मु्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मुंबई पोलीस 5 तास 'शिवतीर्थ' बंगल्यावर ताटकळले, अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलीच नाही; म्हणाले..