Maharashtra Bhushan Award: उद्या (रविवार) पार पडणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथील सेंट्रल पार्कमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. डॉक्टर दत्तात्रय नारायण धर्माधिकारी म्हणजेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तब्बल वीस लाखांपेक्षा जास्त श्री भक्त या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तसेच या सोहळ्यासाठी मुख्य स्टेजची निर्मिती देखील एखाद्या किल्ल्याप्रमाणे करण्यात येते आहे. या मुख्य स्टेजवर सर्वांना बसायची अनुमती नसल्याने स्टेजच्या दोन्ही बाजूला व्हीआयपी आमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर स्टेज समोर श्री भक्तांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पोचले. "हा पुरस्कार सोहळा दुसऱ्यांदा या खारघर मध्ये होतोय याचा मला अभिमान आहे" असे त्यांनी सांगितले. "तसेच आज येणाऱ्या सर्व श्री भक्तांच्या जेवणाची आणि पाण्याची सोय सरकारतर्फे करण्यात आलेली आहे", असेही त्यांनी सांगितले आहे.नवी मुंबईतील खारघर येथे असलेल्या सेंट्रल पार्क मध्ये उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी वेगवेगळ्या महानगरपालिका, प्रशासनाचे फायर इंजिन, अधिकारी आणि जवान सध्या तैनात करण्यात आले आहेत, पण याव्यतिरिक्त श्री सेवक देखील तैनात असणार आहेत, सिडको अग्निशमन दलाकडून श्री सेवकांची एक टीम तयार करण्यात आली आहे, त्यांना फायर एक्सटींगविशर देण्यात आले आहेत, सभेच्या विविध ठिकाणी हे सेवक उभे राहणार आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाला मोठी मदत मिळेल, यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांच्याशी बातचीत पाठवत आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जबाबदारी कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत शंभूराज देसाई आणि रवींद्र चव्हाण या तिघांवर देण्यात आली आहे. यापैकी उदय सामंत यांनी आज सकाळपासून झालेल्या कामांचा आढावा सेंट्रल पार्क येथे येऊन घेतला, यावेळी त्यांनी संपूर्ण सोहळ्यात करण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.
उद्याच्या सोहळ्याची तयारी
50 टक्के लोक रेल्वेने येणार आहेत, त्यांना रेल्वे स्टेशन पासून मैदानात येण्यासाठी खास बसेस आहेत.
10 हजार टॉयलेट्स उभारण्यात आले आहेत.
लोकांच्या वस्तू हरवल्या तर त्यासाठी लॉस्ट अँड फाऊंड अॅप तयार करण्यात आले आहे.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी पासेस वर क्यू आर कोड देण्यात आले आहेत, कोणाला कुठे बसायचे यासाठी आधीच नियोजन आहे.
लोकांच्या मोबाईल रेंज नसेल त्यासाठी 13 विविध कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत.
साप वगैरे काही आले तर त्यासाठी वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी सर्प मित्र तैनात आहेत.
पाण्याची व्यवस्था म्हणून सिडकोने पाईप लाईन टाकून 12 नळ मैदानात दिले आहेत.
येण्याजाण्यासाठी रस्ते नव्हते ते 3 रस्ते 3 दिवसात बांधण्यात आले.
500 छोटे फायर एक्सिंगविशर, 8 क्विक रिस्पॉन्स टीम तैनात ठेवण्यात येणार आहेत.
70 अँब्युलन्स, त्यात 16 कार्डीयक आहेत, एक छोटे हॉस्पिटल देखील तात्पुरते ठेवण्यात आले आहेत.
5 हॉस्पिटल आहेत त्यात प्रत्येक हॉस्पिटल मध्ये 100 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
बेस्टकडून 500, ठाणे 350, नवी मुंबई 200 बसेस आल्या आहेत यांना विविध रेल्वे स्टेशनवर ठेवण्यात येईल, 1350 स्टाफ ठेवण्यात आला आहे, मेकॅनिकल टीम ठेवण्यात आल्या आहेत. 306 एकर पूर्ण एरिया आहे, त्यापैकी एका बाजूला 7 दुसऱ्या बाजूला 32 एकर हा इमर्जेंसी एरिया रिकामा ठेवण्यात आला आहे, लोकांना रेस्क्यू करून इथे ठेवता येईल, 9 हजार टॉयलेट्स बांधून रेडी आहेत. 4200 मोबाईल टॉयलेट्स मुंबई महापालिकेने दिले आहेत. दुर्गंधी येऊ नये म्हणून 20 टन बिडिडी पावडर आणि 1859 लिटर फिनेल ठेवण्यात आले आहे. एकूण 55 मेडिकल बूथ आहेत, प्रत्येक ठिकाणी 2 डॉकटर, नर्स आणि 10 स्वयंसेवक असतील, 10 अँब्युलन्स पेट्रोलिंग करत राहणार, रस्त्यात कोणाला काही झाले तर ते बघणार, आवश्यक औषधांचा साठा गरजेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे,
पार्किंगची व्यवस्था
54 बस आणि कारने येतील, 46 टक्के पब्लिक ट्रान्सपोर्टने येतील, 32 पार्किंग स्लॉट, 11 डेडीकेटेड रोड ठेवण्यात आले आहे, 20 हजार बसेसचे पार्किंग नियोजन करण्यात आले, 3 पार्किंग स्लॉट राखीव ठेवण्यात आले आहे, प्रत्येक स्लॉट मध्ये ट्रॅफिक वॉर्डन, ट्रॅफिक पोलिस अधिकारी, वैद्यकीय पथक असणार आहेत, नायब तहसिलदार नियुक्त करण्यात आले आहेत, 6 हजार श्री सदस्य मदतीसाठी असणार आहेत.
दीड लाख लोकांची जेवणाची व्यवस्था
आज रात्रीसाठी दीड लाख लोकांची जेवणाची व्यवस्था आहे, त्यासाठी 12 काऊंटर ठेवण्यात आले आहेत, 900 लोक एकावेळी जेवण वाढतील.
आपत्ती व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापनासाठी एक वेगळी कमिटी स्थापन करण्यात आली, एन डी आर एफ ची 2 टीम ठेवण्यात आली आहे. चेंगरा चेंगरी होऊ नये यासाठी गेट वर, पार्किंग मध्ये टीम तैनात ठेवण्यात आली आहे.