Navi Mumbai NEET Exam Scam Case: नवी मुंबई : नीट परीक्षेतील (NEET Exam Scam Case) हेराफेरी प्रकरणामुळे अवघा देश हैराण आहे. हा घोटाळा समोर आल्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्य धोक्यात आलं आहे. देशात उघडकीस आलेल्या नीट प्रकरणाचे (NEET Exam) धागेदोरे थेट महाराष्ट्रात (Maharashtra News) येऊन पोहोचले. नीट परीक्षांच्या पेपरफुटीचं रॅकेट चालवणारं रॅकेट लातुरातून (Latur) काम करत असल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात झाला. आता याप्रकरणात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) नीट परीक्षेला डमी विद्यार्थी बसल्याचं प्रकरण समोर आलं आहे. 


महाराष्ट्रातील लातूर येथील NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या डमी विद्यार्थ्यांचं नवी मुंबईतील प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मे महिन्यात नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या केंद्रावर घेण्यात आलेल्या एनईईटी परीक्षेत डमी उमेदवार बसल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी जळगाव येथील उमेदवाराच्या जागी परीक्षेला बसलेल्या राजस्थानमधील एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या 20 वर्षीय विद्यार्थ्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सध्या सुरू असलेल्या नीट परीक्षांमधील हेराफेरीच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यासोबतच नवी मुंबईचं प्रकरणंही सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. 


नवी मुंबईतील प्रकरण कसं उघडकीस आलेलं? 


एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्यावेळी परीक्षा केंद्रावर आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जात होती. परीक्षेला बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याच्या तपशीलाशी ती माहिती जुळत नव्हती, तेव्हा केंद्र प्रभारींना सुरुवातीला वाटलं की, काही तांत्रिक बिघाडांमुळे हे घडलं असावं. त्यानंतर प्रभारींनी त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली. मात्र परीक्षा संपल्यानंतर पुन्हा त्या विद्यार्थिनींची बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली आणि यावेळीही तोच निकाल लागला, त्यानंतर विद्यार्थ्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी ते विद्यार्थी डमी उमेदवार असल्याचं उघड झालं. दरम्यान, आरोपी विद्यार्थी जळगाव येथे राहणारा विद्यार्थी आहे.


या प्रकरणी विद्यार्थीनीनं पुढे खुलासा केला होता की, तिच्या वडिलांची नोकरी गेली होती आणि तिच्या कुटुंबाला पैशाची गरज असल्यानं तिनं हे पाऊल उचललं होतं. तिच्यासोबत एक व्यक्ती राजस्थानातून नवी मुंबईत आली होती, जो तिला परीक्षा केंद्राबाहेर भेटला होता. तो बाहेरच वाट पाहत होता, पण पोलीस परीक्षा केंद्रात हालचाल होताच त्यानं तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी 20 वर्षीय डमी उमेदवाराला अटक केली नव्हती. पण त्यावेळी विद्यार्थीनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपासही आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


NEET Paper Leak Case: लातूर पॅटर्नची देशभर चर्चा, जिथं शैक्षणिक प्रयोगाची बिजं रोवली तिथंच काळिमा फासणाऱ्या कृत्याचे धागेदोरे, गावकऱ्यांची खंत


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI