नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींमधील वाद विकोपाला गेल्यानंतर महापौरांनी महापालिकेत पाय न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता यावर आयुक्तांनी सामंज्यस्याची भूमिका घेत महापौर सुधाकर सोनावणेंची भेट घेतली.
आयुक्त तुकाराम मुंढेंनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून मुंढे आणि भाजपच्या आमदार मंदा म्हाञे यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडाले.
तर दुसरीकडे सभागृहामध्ये पास केलेले प्रस्ताव आयुक्तांकडून धुडकावले जात होते. त्याचबरोबर शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर सुधाकर सोनवणे यांनाही नागरी कामे करताना विश्वासात घेतले जात नसल्याने अवमान होत असल्याचं कारण देत, पालिकेत पाय न ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या 15 दिवसापासून महापौर सुधाकर सोनवणे येत नसल्याने महासभेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होतं. लोकप्रतिनिधींना आयुक्तांकडून योग्य सन्मान दिली जात नसल्याने त्यांच्या विरोधात सभागृहात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.
दरम्यान, लोकप्रतिनिधींशी दरी तयार झाल्याने याचा विकासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आपण महापौर सुधाकर सोनवणे आणि मंदा म्हात्रे यांच्याशी चर्चा केली असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांच्या या पुढाकाराचे आमदार म्हात्रे यांनी मुंढेच्या भूमिकेच स्वागत केल असलं, तरी आपण दिव्यांग मुलांच्या ईटीसी केंद्राच्या भ्रष्टाचाराबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचं म्हंटले आहे.
तर दुसरीकडे आयुक्तांनी प्रभागात येऊन आपली भेट घेतली असली, तरी आपण पालिकेत न जाण्याच्या निर्णयावर अजून तरी आपण ठाम असल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या
तुकाराम मुंढेंकडून मंदा म्हात्रे, महापौरांना चहापानाचं निमंत्रण
...अन्यथा पालिकेत पाऊल ठेवणार नाही, महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंना इशारा
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अधिकारांवर गदा!
नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरुद्ध गणेश नाईकांनी दंड थोपटले!
तुकाराम मुंढे आणि मंदा म्हात्रे यांच्यात पुन्हा बाचाबाची