सोलापूर: अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकाऱ्याने लोकसहभागातून लोकांना अभय देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अधिकाऱ्याने लोकवर्गणीतून सार्वजनिक ठिकाणी आधुनिक सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित केली आहे.


अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची ये-जा असते. त्यामुळे चोरी, लूटमार, छेडछाड, मंगळसूत्र चोरी, तसेच गर्दीमुळे घडणाऱ्या घटनांमुळे बस स्थानकाचं वातावरण असुरक्षित बनल होतं. पण पोलीस निरिक्षक सुरज बंडगर यांच्यामुळे आता पोलिसांची डोकेदुखी काही अंशी कमी होणार आहे.

पोलीस निरिक्षक सुरज बंडगर यांनी लोकसहभागातून अक्कलकोट बस स्थानकाला सीसीटीव्हीचं कवच दिलं आहे. आज या लोकोपयोगी उपक्रमाचं लोकार्पण झालं. ग्रामीण भागात लोकसहभागातून आधुनिक सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित झालेलं अक्कलकोट हे राज्यांतल पहिल बसस्थानक  ठरलं आहे.

लोकवर्गणीतून बंडगर यांनी अक्कलकोट बसस्थानकात बसवलेली सीसीटीव्ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने लोकसहभागातून संपूर्ण शहरात कार्यन्वित केली जाणार आहे.