Navi Mumbai Airport News : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) नमाकरण प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील (D.B. Patil)यांचे नाव देण्याचा निर्णय जलदगतीने घेण्यासाठी केंद्र आणि केंद्रीय नागरी उड्डण मंत्रालयाला आदेश (Navi Mumbai Airport Naming) द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्या आली होती. मात्र हि याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशाप्रकारे प्रशासकीय निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Navi Mumbai International Airport : नाव देण्याचे किंवा नाव बदलण्याबाबतचे आदेश देऊ शकत नाही
कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पाचे नाव बदलणे अथवा नामकरण करण्यासंदर्भातील निर्णय हे प्रशासकीय पातळीवर घेतले जातात. त्यामुळे आम्ही कोणालाही नाव देण्याचे किंवा नाव बदलण्याबाबतचे आदेश देऊ शकत नाही, असे मुख्य न्या. चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले.
दरम्यान, नागरी उड्डाण मंत्रालयासंबंधित नियम आणि वैधानिक तरतुदींनुसार निर्णय घेण्यास अधिकारी सक्षम आहेत. विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्तावावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात येतो. दुसरीकडे, कोणत्या कायदेशीर अधिकारातर्गत ही मागणी केली होती, हे सिद्ध करण्यासही याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे अधोरेखीत करून खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
High Court : अशाप्रकारे प्रशासकीय निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही
नवी मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नावं विनामतळाला देण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दाखल केली होती. या विमानतळाला दि.बा. पाटीलांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. त्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी याचिकेत केली होती. मात्र हि याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशाप्रकारे प्रशासकीय निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Navi Mumbai International Airport : 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, लंडनसारखं भव्य दिव्य
- जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत.
पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक (Eco-friendly) असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे.
जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे.
टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असले तरी प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यात विनानसेवा सुरू होईल.
नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.
संबंधित बातमी: