Home Remedies For Dark Lips : ओठ हा आपल्या चेहऱ्याचा फार महत्वाचा भाग आहे. सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात. गुलाबी ओठ असल्यास सौंदर्यात आणखीच भर पडते. मात्र ओठ काळे पडण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे धुम्रपान करणे. तसेच इतर बऱ्याच कारणांनी ओठ काळे पडू शकतात. ओठ काळे पडल्यानंतर बरेच लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात. मुली काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकची मदत घेतात. मात्र आता ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय करु शकतात. काय आहेत हे उपाय जाणून घेऊयात.


मध आणि लिंबू


गुलाबी ओठ हवे असतील तर मध आणि लिंबू हा एक उत्तम घरगुती पर्याय ठरु शकतो. मध आणि लिंबात क जीवनसत्व असते, जे ओठांसाठी उपयुक्त ठरतं. यात असणारे क जीवनसत्त्व ब्लीचिंग एजेंटचं काम करते. हे मिश्रण ओठांना कंडिशन आणि मॉईश्चरायज करण्याचं काम करते. एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध मिक्स करुन ते ओठांना लावावे. एक तासानंतर लावलेले मिश्रण साफ करावे. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण लावले तर तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते. 


बीट 


ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी बीटाचाही वापर तुम्ही करु शकता. बीटचे तुकडे करावेत. हे तुकडे 15 ते 20 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवावेत आणि थंड झालेले हे तुकडे 5 मिनिटं ओठांवर मसाज करावे. हे केल्याने तुमचे ओठ गुलाबी होऊ शकतात. याव्यतिरिक्त एक चमचा बीट रस घ्यावा, त्यात थोडी साखर मिसळून ओठांना स्क्रब करावे. यामुळेही काळेपणा दूर होऊ शकतो. 


केसर


चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी केसरचा वापर केला जातो. मात्र याचा वापर तुम्ही ओठांचा काळेपण घालवण्यासाठी करु शकता. कच्च्या दुधात केसर मिसळून ते ओठांवर लावावे. किंवा थोडे लोणी घ्यावे त्यात केसर मिसळावे आणि ते ओठांवर लावावे. 


काकडीचा रस


काकडीत अँटीऑक्सिडंट आणि सिलिका रिच कंपाऊंड असतं. हे  कंपाउंड पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. काकडीचा रस नियमित ओठांना लावला तर ओठ गुलाबी होतात. 


बदामाचे तेल


रात्री झोपायच्या वेळी रोज बदामाचे तेल ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात. मात्र हे तुम्हाला नियमित 15 दिवस करणे गरजेचे आहे. 


बर्फ


बर्फचा वापर नियमित केला तर ओठांचा काळेपणा दूर होतो. यासाठी तुम्हाला बर्फाने ओठांवर मसाज करावा लागेल. ज्यामुळे ओठांवरील मृत पेशी निघून जातील आणि ओठ गुलाबी होतात.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Advance Salary for Govt Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार ॲडव्हान्स सॅलरी, राजस्थान ठरले पहिले राज्य