नाशिकमधल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तिकीट वाटपादरम्यान उमेदवारांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरूण शेंदुर्णीकर एका उमेदवारांकडून दोन लाखांची मागणी करताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.
भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातील हा व्हिडीओ कोणी आणि का रेकॉर्ड केला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, प्रचार खर्चासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात येतं आहे.
नाशिकमध्ये भाजपा मध्यवर्ती कार्यालयातली ही व्हीडीओ क्लिप आहे. मात्रस. एबीपी माझा व्हिडीओची सत्यता पडताळत आहे कारण व्हिडीओ बनवणारी व्यक्ती अद्याप पुढे आली नाही.
आमदार सीमा हिरेंचा भाजपला घरचा आहेर
भाजप आमदार सीमा हिरे यांनी या व्हिडीओ क्लिपवरुन स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर भाजपमध्येही तिकीट वाटपावरुन वादंग माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार सीमा हिरे यांनी आरोप केला आहे की, “विश्वासात न घेता काही ठराविक पदाधिकाऱ्यांनी तिकीट वाटप केले. निष्ठावंतांवर अन्याय झाला. काल पक्षात आलेले अनोळखी लोक उमेदवार झाले.”
पाहा व्हि़डीओ :