नाशिक : बाजार समितीमध्ये भाजीपाला पिकांना भावच मिळत नसल्याने भोपळा अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक रुपयाला एक भोपळा विकला जात आहे, ज्यातून दळणवळणाचा खर्चही निघत नाही.
कमी दर मिळत असल्याने उत्पादन आणि दळणवळण खर्चही निघत नाही. बुधवारी बाजार समितीच्या आवारातच भोपळा फेकून शेतकरी माघारी फिरले. वांगी, मेथी, कोथिंबीर या भाजीपाला पिकांचीही हीच परिस्थिती आहे.
वांगी 5 ते 11 रुपये किलो, कोबी, फ्लॉवर 2 ते 7 रुपये किलो, तर पालेभाज्या 4 ते 10 रुपये जुडी या दराने विकल्या जात आहेत.
होळी सणा निमित्ताने परराज्यातील बाजारपेठा बंद राहणार असल्याने नाशिकच्या मालाला उठाव नसल्याचा दावा बाजार समितीकडून केला जात आहे. पुढील चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांचा संताप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 11:07 AM (IST)
भाजीपाला पिकांना दर मिळत नसल्याने नाशिक बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. एक रुपयाला एक याप्रमाणे भोपळा विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भोपळा रस्त्यावर फेकून निषेध केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -