नाशिक: सध्या चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. नाशिकमध्ये तर सोनसाखळी चोर असो की दरोडेखोर, चोरीसत्र चालूच आहे.

मात्र याच नाशिकमध्ये दोन अशा चोरट्या मुली सापडल्या आहेत, ज्यांचं चोरीचं कारणही भन्नाट आहे.

बॉयफ्रेंडला पार्टी देण्यासाठी या युवतींनी चक्क टू व्हीलर चोरली. याप्रकरणी दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेट बॉयफ्रेंडला पार्टी देण्यासाठी टू व्हीलर चोरल्याने, परिसरात हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

नाशिकमधील हटके चोऱ्या

काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एक चोरटा दुकानात घुसला होता, मात्र शटर बंद झाल्याने त्याला बाहेरच पडता आलं नव्हतं. त्यामुळे बाहेर उभा असलेला चोरटा पळून गेला तर आतला चोरटा अलगद पोलिसांच्या ताब्यात सापडला होता.

याशिवाय नुकतंच एका ज्वेलर्समधील कर्मचाऱ्याने जवळपास दहा किलो सोन्यावर डल्ला मारला होता. मात्र पोलिसांनी 24 तासांच्या आत ही चोरी पकडली होती. महत्त्वाचं म्हणजे यापैकी 7 किलो सोनं हे एका विहिरीतून बाहेर काढलं होतं.

संबंधित बातम्या

नाशिकमधील 10 किलो सोनं चोरीचा उलगडा, विहिरीत लपवलेले दागिने जप्त

ना शटर उचकटलं, ना तिजोरी फोडली, तरीही 10 किलो सोनं पळवलं!

शटर उचकटून चोरटा दुकानात घुसला, पण बाहेर येता न आल्याने अलगद सापडला