नाशकात तब्बल 268 काडतुसं सापडल्यानं खळबळ
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2018 09:38 PM (IST)
नाशिकमध्ये तब्बल 268 काडतुसे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये तब्बल 268 काडतुसे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वर-वासळी गावात नासरडी नदीवरील पुलाखाली काडतुसांचा साठा काही नागरिकांनी पाहिला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. बॉम्ब शोध पथकासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी 268 काडतुसं ज्यात एके 47, 9 एमएम आणि 212 राऊंड शिवाय 56 पुंगळ्या सापडल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा साठा सापडल्यानं गावकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड घबराट आहे. दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ही काडतुसे गंजलेल्या अवस्थेत असल्याने काही वर्षापूर्वीची ती असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.