नाशिक : तरुणाच्या छळाला कंटाळून एका दिव्यांग शिक्षिकेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या शिंदे-पळसे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय.


 
वंदना जाधव असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. सामनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण पंकज ठाकूरला अटक केलीय.

 
जाधव यांनी तरुणाविरोधात एक महिन्यापूर्वी नाशिकरोड पोलिस स्टेशनला तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे वैतागलेल्या वंदना जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.