औरंगाबाद : औरंगाबादेतील दानिश ट्रॅव्हल्सची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रशांत हिरे, पुत्र अद्वय हिरे आणि त्याचा साथीदार प्रतिक काळे विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.


 

गतवर्षी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या दोन आमदारांसह 18 सदस्यांनी मुंबईहुन-कोलकत्ता विमानवारी केली होती. यासाठी औरंगाबादेतील दानिश टूर्स अॅण्ड ट्रॅवेल्स कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दानिश टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या हिदायत खान यांनी यासाठी 10 लाख 24 हजार रुपये खर्च केले होते.

 

आपली मत फुटू नयेत म्हणून प्रशांत हिरेंनी सदस्यांना मुंबई तो कोलकत्ता अशी विमान सफारी घडवून आणली. पण ही निवडणूक अद्वय हिरे हारले आणि त्यामुळे त्यांनी या ट्रॅवेल्स कंपनीचे विमान तिकीट बुकिंगचे पैसेच दिले नाहीत. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यासह 18 जनाविरूद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.

 

या विमान प्रवासाची मजा लूटणाऱ्यांमध्ये नाशिकचे शिवसेना आमदार अनिल कदम, सेना आमदार सुहास कांदे, प्रशांत हिरे यांचे मेहुणे राजेश शिंदे यांच्यासह 18 लोकांचा सहभाग होता.