नाशिक : शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.''
तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. आपण सत्तेत आहोत कि विरोधात आहोत, याचंच त्यांना भान राहात नाही, अशी टीका सुळे यांनी यावेळी केली.