नाशिक : मनसेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोंबडे हे नाशिक महापालिकेत नगरसेवक आहेत. कोंबडे यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेला नाशिकमध्ये आणखी एक खिंडार पडली आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिन्नरमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच सुदाम कोंबडेंनी भाजपात प्रवेश केला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील महत्त्वाचा नेता भाजपात दाखल झाल्याने मनसेला मोठा फटका बसला आहे.
याआधी नाशिकमधील मनसेचे महापौर यतिन वाघ यांनी शिवेसनेत प्रवेश केला. तर माजी आमदार वसंत गीते, सभागृह नेते शशी जाधव यांसारख्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर आज सुदाम कोंबडे यांच्या रुपाने मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.