नाशिक: नाशिकमध्ये मुलाने राहत्या घरातच आईची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई जादूटोणा करत असल्यानं वडील दारू जास्त पितात या आरोपावरून मुलानं ही हत्या केल्याचं समजतं आहे.


सोमिबाई महाले असं हत्या झालेल्या महिलेच नाव आहे. सुरगाणा तालुक्यातील साबरदारा गावात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. शनिवारी सकाळी मुलानेच पोलीस आणि नातेवाईकांसमोर हा प्रकार उघडकीस आणला.

आईने इतर कोणावर जादूटोणा करू नये, म्हणून ही हत्या केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला अटक करुन कोर्टात हजर केलं. दरम्यान, कोर्टानं आरोपी प्रकाशला 30 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.