नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूरमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी सावरकर वाड्याची भेट घेतली. सावरकरांच्या घराचं दर्शन हे मंदिराच्या दर्शनापेक्षाही पवित्र असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.


भाजपतर्फे आज राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकमधील भागुरमध्ये सावरकरांच्या वाड्याची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सावरकरांना आंदरांजली वाहिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सावरकर वाड्याचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभाही घेतली.

यावेळी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, ''सावरकर हे एक व्यक्ती नव्हते तर संस्था होते. स्वातंत्र्य लढयासाठी त्यांच्या संघर्षाची राज्यकर्त्यांनी सदैव उपेक्षा केली. आंदमानमधील त्यांचं नाव पुसुन टाकण्यांचं काम काही मंत्र्यांनी केला.''

पण त्या मंत्र्यांनी आंदमानच्या सेल्युलर जेलमधील कोलू ओढून दाखवावं म्हणजे समजेल. सावरकरांचा अपमान म्हणजे स्वातंत्र्याचा अपमान असल्याचंही ते यावेळी म्हणाले.