नाशिक : रडायचं नाही, ही मर्दाची छाती आहे अशी शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली, म्हणूनच तुरुंगात भगवा फडकवत, हसत गेलो आणि बाहेररी भगवा फडकवतच आलो असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Shivsena Sanjay Raut allegation on BJP) म्हटलं. अबू जिंदाल नावाच्या अतिरेक्याला तुरुंगात ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी आम्हाला ठेवलं, तुरुंगात काय-काय भोगलं हे कधीतरी सांगेन असंही संजय राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, या सरकारने मला 110 दिवस तुरुंगात टाकलं पण मी अजिबात खचलो नाही. या बाळासाहेबांच्या शिवसेनेने मला दिल्लीपर्यंत नेलं त्या शिवसेनेसाठी माझ्या आयुष्यातले 110 दिवस दिले. अतिरेक्याला ठेवण्यात आलेल्या ठिकाणी आम्हाला ठेवलं. तुरुंगात आम्ही काय काय भोगलं हे नंतर कधीतरी सांगेन. 2024 ला आम्ही सत्तेवर येऊ तेव्हा याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. 


या आधी तुरुंगातील अनुभवाविषयी बोलताना संजय राऊतांनी जेलमधील कैद्यांना मदत केल्याचं सांगितलं होतं. 'मी जेलमध्ये असताना अनेक जणांना मदत केली. शिवसैनिक आहे, मदतीला येतो कुठेही' असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये असताना 8959 हा त्यांचा कैदी क्रमांक होता. तर त्यांच्यासाठी विशेष बराकीची सोय करण्यात आली होती. मग संजय राऊत यांनी मदत केलेल्यांमध्ये केवळ राजकीय कैदी आहेत की आणखी कोण हे मात्र गुलदस्त्यात राहिलं आहे. 


बीबीसीच्या कार्यालयावर छापेमारीबाबत संजय राऊत म्हणाले, "सरकारला प्रश्न विचारले जातात, तिथे अशा प्रकारच्या धाडी टाकल्या जातात. अटक केली जाते, याचं मी एक उदाहरण आहे. लोकशाही संकटात आहे. या देशामध्ये वृत्तपत्रांच्या बाबतीत अशा प्रकारचे वर्तन कधी घडल्याचं स्मरणात नाही. आणीबाणीमध्ये वृत्तपत्रांमध्ये सेन्सॉरशिप लावली त्यावेळी याच भारतीय पक्षानं मोठे आंदोलन उभारलं होतं. पंडित नेहरूंपासून राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंहांपर्यंत कोणत्याही राजवटीमध्ये या देशात अशा प्रकारे वृत्तपत्रांच्या बाबतीत वाईट कृत घडल्याचं ऐकवात नाही. त्यामुळे आपल्या लोकशाही संदर्भात जगामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. भाजपचं सरकार आल्यानंतर न्यायपालिका आणि वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे."


ही बातमी वाचा: