नाशिक : नाशिकमधल्या करन्सी नोट प्रेसमधील सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. चलन छपाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे.
नोटाबंदीच्या काळात केलेल्या अभूतपूर्व छपाईबद्दल कर्मचाऱ्यांना हे बक्षीस देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दिल्लीत झालेल्या अॅपेक्स कमिटीच्या बैठकीत एसपीएमसीआयएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जगदिश गोडसे आणि पदाधिकारी यांनी दिल्ली दौऱ्यात विविध अधिकारी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससोबत बैठक केल्यानंतर यासंदर्भातली अधिकृत माहिती देण्यात आली.
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारात अंमलबजावणी आणि थकबाकी देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.