नाशिकमध्ये शाळकरी मुलाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 11 Mar 2018 10:20 PM (IST)
नाशिकमध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. आज रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास सचिन पाळदे नावाच्या या शाळकरी मुलाने आत्महत्या केली.
नाशिक : नाशिकमध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. आज रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास सचिन पाळदे नावाच्या या शाळकरी मुलाने आत्महत्या केली. देवळाली कॅम्प परिसरात महालक्ष्मी मंदिराजवळ राहणाऱ्या सचिन पाळदे या 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने शिकवणीसाठी जातो असं सांगून सचिन रविवारी सकाळी घर सोडलं. त्यानंतर लालपूल परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्स्प्रेससमोर येत त्याने आत्महत्या केली. दुपारी काही स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. सचिन हा देवळाली हायस्कूलचा विद्यार्थी असून तो नववीत शिकत होता. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.