नाशिक : उद्योगमहर्षी रतन टाटा यांनी सोमवारी नाशिकमधल्या मनसेच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. यावेळी टाटांनी नाशिकमधल्या उद्योजकांशी अनौपचारिक भेट घेत चर्चाही केली.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर टाटा यांना नाशिकला आणत मनसेने जोरदार ब्रँडिंग केल्याचं बोललं जातं आहे. सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत टाटा यांनी बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. टाटांच्या सीएसआर फंडमधूनच या गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डनच्या अनोख्या स्थापत्य शैलीचे, तिथल्या कृत्रिम प्राणी आणि थ्री डी शोची पाहणी करून टाटांनी कौतुक केले.



यावेळी नाशिकच्या काही उद्योजकांनी टाटांचे स्वागत करत अनौपचारिक गप्पा मारल्या. विमानतळ तयार आहे, पण विमानसेवा सुरु करा. पोषक वातावरण आहे, उद्योग सुरु करा अस साकडं या उद्योजकांनी टाटांना घातले. मनसेच्या नाशिक नवनिर्मानाच यानिमित्ताने ब्रँडिंग करण्यात राज ठाकरे यशस्वी झाले.