नाशिक : राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिकची रसिका शिंदे घवघवीत यश मिळवणे उत्तीर्ण झाली असून 89 टक्के गुण मिळाले आहेत. अभ्यासत हुशार असणारी रसिका आघाडीची क्रिकेटपटू आहे. राज्य, राष्ट्रीय स्पर्धा तिने गाजवल्या असून पुढे जाऊन क्रिकेटमध्ये करियर आणि आयपीएस अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे. रणजी स्पर्धेत कामगिरी बजावणारी रसिका सध्या धुळे जिल्ह्यात सराव करत आहे.


बारावीच्या परीक्षेत दरवर्षी प्रमाणेच पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. अनेक आव्हानाचा प्रतिकूल परिस्थितीचा सामान्य करत मुलींनी यश संपादन केल आहे. यातच नाशिकच्या रसिका शिंदे या विद्यार्थिनीने घवघवीत यश संपादन केलाय. गुरुवारी लागलेल्या निकलात रसिकाला 88.63 टक्के म्हणजेच 89 टक्के गुण मिळाले आहेत. ती विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. रसिका ही नाशिकची अव्वल दर्जाची क्रिकेटपटू आहे. मैदानात उत्तुंग चौकार षटकार ठोकणारी रसिका अभ्यासातही कमी नाही. कुठलाही क्लास न लावता स्व अध्ययनावर भर देत तिने 12 नियोजनबद्ध अभ्यास केला आहे. सकाळ सायंकाळ पाच पाच तास मैदानात सराव करायची. आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यायची आणि दुपारच्या सत्रात कॉलेज आणि रात्री अभ्यास असा तिचा दिनक्रम होता. कॉलेज मध्ये पूर्ण लक्ष देऊन तोच अभ्यास नियमितपणे घरी करत गेली खेळ आणि अभ्यास दोन्हीना एक्सरकहीए महत्व देत यशाची पताका दोन्ही क्षेत्रात फडकावली. खेळात वेळ देणारे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात हा समज तिने खोटा ठरविला आहे. रसिकाने ऑलराऊंडर खेळाडू आहे. चार राष्ट्रीय स्पर्धा राज्य स्तरीय स्पर्धा आणि रणजी स्पर्धेत महाराष्ट्रच प्रतिनिधित्व केल आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या स्पर्धेत तीन विकेट, दोन वेळा अर्धशतक झळकावल्याने महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या स्थानवर झेप घेऊ शकला. या स्पर्धेत तिला बेस्ट प्लेअरचा किताब मिळाला होता.


रसिकाने दहावीतही दैदीप्यमान यश मिळवलं आहे. आयपीएस होण्याचे तिचे स्वप्न असून क्रिकेट मध्येही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करायचे आहे. बारवीनंतर विज्ञान शाखेत शिक्षण सुरू ठेवायचे की, कला शाखा घेऊन क्रिकेटच्या सरावला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला जास्तीतजास्त वेळ द्यायचा याचा निर्णय अद्याप तिने केला नाही. तिचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. वडिलांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आला आहे. तर आई प्राथमिक शिक्षक आहे. मोठा भाऊ अभियंत्रिकीचे शिक्षण घेत असून मोठ्या भावामुळे तिला क्रिकेटची गोडी लागली. ज्याना कमी गुण मिळाले त्यांनी हताश होऊ नये संतुलित आहार घेऊन मनाची एकाग्रता वाढवावी, खेळांकडे ही लक्ष द्याव नकारात्मक विचार सोडून सकरात्मक विचार करत नवनव्या आव्हानांचा सामना करावा यश हमखास मिळते असा सल्ला ती विद्यार्थ्यांना देत आहे.


संबंधित बातम्या :








 

HSC Results | बारावीच्या निकालात कोकणची बाजी तर नागपूरच्या चैतन्य अय्यरचे घवघवीत यश