नाशिक : नारायण राणे मंत्री होणारच असा पुनरुच्चार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केला. राणे मंत्री म्हणून येणार आणि सरकार अस्थिर होणार नाही, असे ते म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
“कुणी या किंवा जा, आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमचं सरकार स्थिर आणि नेतृत्व खमकं आहे.”, असे गिरीश बापट म्हणाले.
उद्धव ठाकरेंना काही अडचण असली तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात, असे सांगायलाही गिरीश बापट विसरले नाहीत.
मागील कर्जमाफीचे पैसे 18 महिन्यांनी मिळाले होते. फालतू लोकांनी पैसे लाटू नये ही आमची इच्छा म्हणून कर्जमाफीला उशीर झाला, असे गिरीश बापट यांनी कर्जमाफीसंदर्भात सांगितले.