नाशिक : मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानतंर, आता राज ठाकरे कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नागरिकांशी संवाद साधत आहेत. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी थेट जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


पक्षावर आलेलं मळभ दूर करण्यासाठी मनसे अध्यक्षांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे. त्याचा भाग म्हणून राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसून बातचीत केली.

साधारण आठ महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात आज ते समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. कल्याण, शहापूर, इगतपुरीचे शेतकरी शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेतील.

दरम्यान, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे 18 नोव्हेंबरला ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत.

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची जाहीर सभा