नाशिक : तुरुंगात दोन कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माकडटोपी न दिल्याच्या वादातून नाशकातील जेलमध्ये ही हत्या झाली.


माकडटोपी न दिल्याच्या रागातून सचिन चावरे नावाच्या कैद्याने तानाजी माने या कैद्याची हत्या केली. वादानंतर सचिन चावरेने 70 वर्षीय तानाजीला वीट फेकून मारली, यात त्याचा मृत्यू झाला.

नाशिकरोड जेलमध्ये ही घटना घडली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मानेचा मृत्यू झाला. तानाजी माने हा जन्मठेपेची शिक्षा भोगत होता, तर चावरे हा 5 महिन्याची शिक्षा भोगत होता. नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.