नाशिक : नाशकातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन बंद होण्याची शक्यता आहे. मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी केंद्रीय मंत्र्यांकडे यासंदर्भात मागणी केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन बंद करावं, अशी मागणी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी केली आहे. मंदिरातील पेड दर्शन बेकायदेशीर असल्याचं सांगत शिंदे यांनी त्याविरोधात आवाज उठवला आहे.
केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा यांची भेट ललिता शिंदे यांनी घेतली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पेड दर्शन बंद करण्यासंदर्भात पत्र शिंदेंनी दिलं आहे.