नाशिकमध्ये खुल्या पद्धतीनं कांदा विक्रीला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 05:56 AM (IST)

नाशिक : गेल्या महिन्याभरापासून आडतबंदीच्या निर्णयावरुन ठप्प असलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. काल पिंपळगाव बाजार समितीत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत कांद्याचा खुल्या पद्धतीने लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळपासून मनमाड, लासलगावच्या बाजारपेठेत लिलाव सुरु झाले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची आडत न स्वीकारता लिलाव झाले आहेत. दरम्यान, याप्रश्नावर काल नवी दिल्लीत राधामोहन सिंग, नितीन गडकरी, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी केंद्र सरकारनं 50 टक्के कांदा विकत घ्यावा आणि उरलेला 50 टक्के कांदा राज्यानं विकत घ्यावा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.