माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या प्रचारसभेकडे नाशिककरांची पाठ!
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 19 Feb 2017 04:01 PM (IST)
नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेकडे नाशिककरांनी पाठ फिरवली आहे. आज रविवार दुपारी 2.30 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र तीन वाजून गेल्यावरही खुर्च्या रिकाम्या पडल्या आहेत. नाशिकमध्ये वडाळा गावात सह्याद्री हॉस्पिटलसमोर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र 3 वाजून गेल्यानंतर स्टेजवर नेतेमंडळी दाखल झाली, पण नाशिककरांनी मात्र या सभेकडे पाठ फिरवली आहे. नाशिकमधील या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी स्थानिक नेते आणि उमेदवारांची धावपळ सुरु आहे. काल शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सभेकडेही पुणेकरांनी पाठ फिरवली होती. या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं होतं. संबंधित बातम्या