मुंबई: तळेगावमधल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पेटलेलं नाशिक हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच, आता त्या घटनेवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे.

नाशिकमधली परिस्थिती चिघळण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. तसंच नाशकात दुफळी माजवणारे दुसरे तिसरे कोणी नसून, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय होते असा मोठा आरोप सेनेकडून करण्यात येतो आहे.

'अशा घटनांबाबत वक्तव्य करणं चुकीचं आहे. बलात्कार झाला की नाही हे वैद्यकीय अहवालानंतर पोलीस कोर्टाला त्याबाबत माहिती देतात. त्यामुळे गिरीश महाजनांनी त्याबाबत आधीच वक्तव्य करणं चुकीचं होतं. या प्रकरणामुळे आधीच लोकांमध्ये अस्वस्थता होती.' असा आरोप निलम गोऱ्हेंनी केला आहे.