नाशिक शहर आणि ग्रामीण मिळून 53 गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअॅप अॅडमिनचाही समावेश आहे. तसंच हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे 2 कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे, असंही विनयकुमार चौबे यांनी सांगितलं.
एसटीचं सर्वाधिक नुकसान
नाशिकमधील आंदोलनात एसटीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. 2 ते 3 दिवस चाललेल्या या आंदोलनात तब्बल 19 एसटी बस जाळल्या. तर एसटी सेवा बंद राहिल्यामुळे एसटी महामंडळाला 3 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे.
नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात
दरम्यान, नाशिकमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. शाळा आणि बस सेवा कालपासून सुरळीत सुरु आहे. मात्र, बंद असलेली इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. उद्यापर्यंत इंटरनेट सेवा सुरु होणार असल्याची माहिती समजते आहे.
तसंच परिस्थितीचा आढावा घेऊनच संचारबंदी मागे घेण्यात येईल, असंही पोलिस आयुक्त आणि महानिरीक्षकांनी सांगितलं.
संबंधित बातम्या