नाशिकच्या शालीमार पेंट कंपनीला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम | 19 Nov 2016 11:20 PM (IST)
नाशिक : नाशिकमधील शालीमार पेंट कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मोठं नुकसान झालं आहे. गोंदे गावातील ही घटना आहे. आगीचे लोळ आजूबाजूच्या परिसरात दहा किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गोंदे गाव खाली करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे 10 बम्ब आणि 100 पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कंपनी मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच असल्याने काही काळासाठी वाहतूकही रोखण्यात आली. आगीत केमिकलचे ड्रम भस्मसात होत असल्याने आग आणखीच भडकत आहे. त्यामुळे अग्नीशमन विभागाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.