जम्मू-काश्मीर : नाशिकच्या सिन्नरमधील जवान राजेश केकाण आणि पत्नी शोभा केकाण यांची त्यांच्याच सहकाऱ्यानं गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडजवळील औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांच्या निवासी वसाहतीत ही घटना घडली आहे.
ईगलप्पा असं सहकारी जवानाचं नाव असून त्यानं आधी स्वतःच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर जवान राजेश केकाण आणि त्यांच्या पत्नीवरही गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. राजेश केकाण हे मूळचे सिन्नरच्या टेंभूरवाडी गावातले आहेत.
हत्येच्या बातमीनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत राजेश केकाणच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, वडिल असा परिवार आहे. दरम्यान, या हत्येचं मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नाशिकमधील जवान आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2017 07:34 PM (IST)
नाशिकच्या सिन्नरमधील जवान राजेश केकाण आणि पत्नी शोभा केकाण यांची त्यांच्याच सहकाऱ्यानं गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -