नाशिक: नाशिकमध्ये भाजप नगरसेविका ज्योती गांगुर्डेंच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह एका कारमध्ये संशयास्पद आढळला असून त्यांच्या मृत्यूमागचे कारण आद्याप अस्पष्ट आहे.
अर्जुन गांगुर्डेंच्या पतीचा मृतदेह पेठरोडजवळील एका निर्जन स्थळी वॅगेनार कारमध्ये सापडला. याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला, आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान घटनास्थळी पोलिसांना मृतदेहाशेजारी चिठ्ठी सापडली असून पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.