नाशिक : कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप अविश्वास ठराव आणत आहे. मात्र भाजपच्या या प्रस्तावाविरोधात नाशिककर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककर आता एकवटले आहेत. सत्ताधारी भाजपकडून अविश्वास ठराव आणला जात असून त्याला विरोध करण्यासाठी नाशिककर सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत.
ट्विटरवर #WeSupportMundhe #NashikForMundhe #NashikSupportsMundhe असा ट्रेंड चालवला जात आहे. तर तरुणाईकडून अनेक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले असून त्यावर सत्ताधारी भाजपसह सर्वच नगरसेवकांविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय.
करवाढीचा मुद्दा पुढे करत तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला जात आहे. नगरसेवकांमध्ये आयुक्तांविरोधात नाराजी असल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्येच संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे.
https://chat.whatsapp.com/7OUiw6lFr3l36zkNjQzq5o या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असून या लिंकवर क्लिक करुन ग्रुप जॉईन करण्याचं आवाहन केलं जात आहे.
तुकाराम मुंढेंच्या समर्थनासाठी नाशिककर एकवटले
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
28 Aug 2018 10:26 AM (IST)
सत्ताधारी भाजपकडून अविश्वास ठराव आणला जात असून त्याला विरोध करण्यासाठी नाशिककर सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -