नाशिक : हिवाळ्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक शहराचं आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे, तर निफाडच्या तापमानाचा पारा 10.2 अंशांवर घसरला आहे.
दिवाळीनंतर राज्यात थंडीचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. नाशिक शहराचं आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. आज सकाळी नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली दिसत होती.
तर निफाडमध्ये तापमानाचा पारा 10.2 अंशावर घसरल्याने, नाशिककरांमध्ये थंडीनं हुडहुडी भरली आहे. तिकडे मालेगावमध्येही पारा दिवसेंदिवस कमी होत असून, मालेगावमध्ये आज 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
नाशिकसह राज्यातील इतर जिह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात 14.1 अंश तापमान नोंदवण्यात आलं. थंडीचा कडाका वाढल्याने पंढरपुरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
तर पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, थंडीपासून बचावासाठी पुणेकर कानटोप्या, स्वेटर घालून चहाचा आस्वाद घेत आहेत. तर कुठे व्यायाम करताना दिसत आहेत.
नाशिक आणि निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2017 11:50 AM (IST)
हिवाळ्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. नाशिक शहराचं आजचं तापमान 10.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे, तर निफाडच्या तापमानाचा पारा 10.2 अंशांवर घसरला आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -