बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 31 Jul 2017 12:39 PM (IST)
घरी कुकरमध्ये बटाटे शिजवायला ठेवले असताना कुकरचं झाकण अचानक उघडून अंगावर आल्यामुळे वडापाव विक्रेता जखमी झाला होता
नाशिक : बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 45 वर्षीय अशोक पाटील हे वडापाव विक्रेते होते. रविवारी दुपारी त्यांनी घरी कुकरमध्ये बटाटे शिजवायला ठेवले होते. त्यावेळी शिटी होत नसल्यामुळे पाटील कुकरजवळ गेले. अचानक कुकरचं झाकण अचानक उघडून अंगावर आल्यामुळे पाटील यांचं पोट, छाती आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती. त्याचप्रमाणे किचनमधील सामानही अस्ताव्यस्त पडलं. अशोक यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाशिकमधील जेलरोड परिसरातील अयोध्यानगर मध्ये ही दुर्दैवी घटना घडली.