नाशिक : राज्यभर गाजलेल्या त्र्यंबकेश्वरमधील टाके हर्ष नरबळी प्रकरणी नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आई आणि सासूचा नरबळी देणाऱ्या 11 आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधल्या टाके हर्ष या आदिवासी गावात ऑक्टोबर 2014 मध्ये हा प्रकार घडला होता. बच्चीबाई खडसे या तांत्रिक महिलेसह आई आणि सासूचा नरबळी देण्यात आला होता. श्रमजीवी संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणलं होतं.
काय आहे प्रकरण?
घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख समाधान मिळत नाही, पैसा टिकत नाही, असा समज मांत्रिकाच्या नादी लागलेल्या काशीनाथ आणि गोविंद दोरे या भावांचा करुन देण्यात आला. त्यातूनच त्यांनी जन्मदात्या आईसह सासू आणि तांत्रिक महिलेचा बळी दिला.
बळी देण्याआधी आईच्या नग्न शरीरावर नाचून तिचे हाल करण्यात आले. इतकंच नाही, तर नराधम मुलांनी तिचे डोळेही फोडले. मांत्रिक महिलेच्या सासूलाही अशाचप्रकारे हाल करुन जीवे मारण्यात आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या बहिणीने नग्नावस्थेतच पळ काढला आणि आपला जीव वाचवला.