नाशिक : पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून एका आरोपीने चोरलेल्या दुचाकी चक्क एका विहिरीतच टाकून दिल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.
एमआयडीसी परिसरातील एका घरफोडीच्या गुह्यात पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. त्यांची चौकशी सुरु असतानाच यातील डॉलर साळवे या आरोपीने 18 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्या दुचाकी जप्त करताना पोलिसांना 18 पैकी 14 दुचाकी सापडल्या, पण बाकीच्या चार गाड्यांचा तपास लागत नव्हता.
अखेर डॉलरला पोलिसी खाक्या दाखवताच चुंचाळे शिवारातील एका विहिरीत चार दुचाकी लपवून ठेवल्याचं त्याने सांगितलं आणि हे ऐकून पोलिसही चक्रावले. पोलिसांनी सोमवारी सकाळी विहीर गाठली, मात्र ती तुडुंब पाण्याने भरलेली असल्याने त्यांना अडचणी निर्माण येत होत्या. मोटार लावून त्यांनी पाणी बाहेर काढत क्रेनच्या सहाय्याने दुचाकी बाहेर काढण्याचं काम सुरु केलं. यावेळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. रात्री आठ वाजेपर्यंत पोलिसांना तीन दुचाकी मिळाल्या.
डॉलरकडून अजून काही गुन्हे उघडकीस येाण्याची शक्यता असून पुढील तपास अंबड पोलिस करत आहेत.
पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून चोरलेल्या दुचाकी विहिरीत लपवल्या!
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
19 Jun 2018 12:12 PM (IST)
पोलिसांनी सोमवारी सकाळी विहीर गाठली, मात्र ती तुडुंब पाण्याने भरलेली असल्याने त्यांना अडचणी निर्माण येत होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -