नाशिक: एटीएममध्ये पैसे नसणं किंवा एटीएममध्ये एखाद्या बिघाडानं पैसे न मिळणं असे प्रकार आपण अनेकदा अनुभवले आहेत. मात्र नाशिकमध्ये एका ATM मध्ये प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिघाड झाला. जर एटीएममध्ये तुम्ही पैसे काढण्यासाठी ठराविक रकमेचा आकडा टाकला आणि एटीएममधून जर त्याच्या पाच पट पैसे आले तर?
नाशिकमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा बिघाड झाला. या ATM मधून जर पैसे काढण्यासाठी ठराविक रक्कम टाकली, तर चक्क त्या रक्कमेच्या 5 पट पैसे एटीएममधून निघत होते.
नाशिकच्या विजयनगर भागातल्या अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. अनेक तास हा प्रकार सुरु होता. त्यादरम्यान अनेकांनी या ATM मधून पैसेही काढले. अखेर हा प्रकार बँकेच्या लक्षात येताच, पोलीस बंदोबस्तात ATM बंद करण्याची वेळ आली.
दरम्यान, बिघाडाच्या काळात ज्या लोकांना ATM मधून अधिकचे पैसे मिळाले, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, असं बँकेनं स्पष्ट केलंय. मात्र ठराविक काळात ज्यांनी पैसे काढले त्यांना ठराविक काळासाठीच आनंद मिळाला.