इगतपुरीतल्या एका रिसोर्टमध्ये 16 जून, शुक्रवारी पहाटे साडे चार वाजता पाटील यांनी योग करण्यास सुरुवात केली. 18 जूनला म्हणजे रविवारी दुपारी एक वाजून 33 मिनिटांनी त्यांनी तामिळनाडूच्या के. पी. रचना यांचा सलग 57 तास 2 मिनिटं योग करण्याचा विक्रम मोडित काढला.
आता सर्वाधिक म्हणजे सलग शंभर तास योग करण्याच्या विक्रमाकडे प्रज्ञा पाटील यांनी वाटचाल सुरु केली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सलग योग करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवण्याकडे पाटील यांचा कल आहे.

48 वर्षीय प्रज्ञा पाटील योग विषयात पीएचडी करत आहेत. 12 योग शिक्षकांची टीम हा विश्वविक्रमचा उपक्रम पुर्ण रेकॉर्ड करत आहे. ओमकार, सहजासनापासून 45 मिनिटांपर्यंत एकाच आसनात राहण्याच्या अनेक योगक्रिया त्या करत आहेत.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी सोमवारी रात्री या ठिकाणी हजेरी लावून सोपस्कार पार पाडतील. त्यानंतर मंगळवारी सकाळी नव्या विश्वविक्रमाची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.