नाशिक : रुममेट्सच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शुभम पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो बीएससी अॅग्रीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.
20 वर्षीय शुभम पाटील या विद्यार्थ्याने आडगाव परिसरातील भाड्याने घेतलेल्या घरात दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली होती. रुममेट्स माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याकडून काम करुन घेत असल्याचा उल्लेख नोटमध्ये केला होता.
शुभमच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आणि सुसाईड नोटमधील मजकुरानुसार काल (21 डिसेंबर) रात्री उशिरा, त्याच्यासोबत राहणाऱ्या चार मुलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक केलेली नाही. ही मुलं दुसऱ्या कॉलेजमधील असल्याचं कळतं.
शुभम पाटील हा मूळचा जळगावचा असून तो शिक्षणासाठी नाशिकमध्ये आला होता.
नाशिकमध्ये रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
Updated at:
22 Dec 2017 01:31 PM (IST)
20 वर्षीय शुभम पाटील या विद्यार्थ्याने आडगाव परिसरातील भाड्याने घेतलेल्या घरात दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -