नाशकात 21 वर्षीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2018 05:10 PM (IST)
समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील राहत्या खोलीतच गौरी जाधवने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
नाशिक : नाशिकमध्ये समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेम प्रकरणातून 21 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गौरी जाधव ही विद्यार्थिनी नाशिकच्या समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात राहत होती. राहत्या खोलीतच गौरीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरीच्या मृतदेहाजवळ असलेल्या एका टेबलवर पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणातून गौरीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.