नाशिक: विधीमंडळात उंदीर घोटाळा गाजत असतानाच, तिकडे पंचवटी एक्स्प्रेसमध्येही उंदरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय.


एरव्ही प्रवाशांना हैराण करणाऱ्या उंदरांनी यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यालाच लक्ष्य केलं. उंदराने रेल्वे कर्मचाऱ्याच्या पायाचा चावा घेतला.

निफाड ते मुंबई प्रवासादरम्यान उंदराने कर्मचाऱ्याचा चावा घेतला.

पंचवटीसह सर्वच एक्स्प्रेसमध्ये उंदीर उच्छाद मांडत असल्याची तक्रार प्रवासी वारंवार करतात. मात्र त्यावर ठोस उपाय काही होत नाही.

आता उंदराने रेल्वे कर्मचाऱ्याचाच चावा घेतल्यावर तरी प्रशासन जातीने लक्ष घालणारा का,  अशी विचारणा रेल परिषदेनी केली.



'मंत्रालयात उंदीर महाघोटाळा'

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सरकारवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्रालयात उंदीर महाघोटाळा झाल्याचा आरोप खडसेंनी विधानसभेत केला आहे. मंत्रालयात 3 लाख 29 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र 7 दिवसांनंतरच सर्व उंदीर मारल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे.. हे कसं काय शक्य झालं? असं म्हणत खडसेंनी चौकशीची मागिणी केली आहे.

कंत्राटदाराचे उंदीर मारण्याचे कौशल्य लक्षात घेता त्यानं मिनिटाला ३१.६८ उंदीर या प्रमाणे दरदिवशी ४५ हजार सहाशे उंदीर मारलेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या
मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप