नाशिक : ऐन मराठी दिनालाच कविवर्य कुसुमाग्रजांचा विसर पडलेल्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांना 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर जाग आली आहे. कुसुमाग्रजांची जन्मभूमी अर्थात नाशिकमध्येच मराठी दिनाची उपेक्षा सकाळी पहायला मिळाली होती.


वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मराठी दिनाला नाशिक महापालिकेकडून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मात्र आज सकाळपासून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी शुकशुकाट होता.

'एबीपी माझा'नं ही बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासन आणि नेत्यांना जाग आली. भर दुपारी विद्युत रोषणाई करत मनसेच्या गटनेत्यांसह पालिका अधिकारी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी पोहचले. शिरवाडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन नेतेमंडळींनी फोटोसेशन उरकलं.